सरकारविरोधात तरुण-तरुणींनी पेटून उठले पाहिजे, अजित पवारांचा एल्गार

जळगाव, १५ सप्टेंबर २०२२ : वेदांता आणि फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे महाराष्ट्रातील दीड ते दोन लाख रोजगार गेला आहे, त्यामुळे सरकारविरोधात तरुण तरुणींनी या विरोधात आवाज उठवला पाहिजे तसेच सरकारने जनतेला वेड्यात काढले नाही पाहिजे, राजकारण आम्हीही केले आहे असं वक्तव्य विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी जळगाव येथील सभेत बोलतानी केलं आहे.

दरम्यान अजित पवार यांनी अनेक मुद्द्यावरून सरकारवर ताशेरे ओढले आहेत. यापेक्षा दुसरा मोठा प्रकल्प राज्यात येणार असं लॉलीपॉप सरकारकडून दाखवलं जात आहे. दुसरा प्रकल्प तर आलाच पाहिजे पण, हा देखील प्रकल्प महाराष्ट्रात राहिला पाहिजे. महागाई बेरोजगारी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर हे सरकार गप्प का बसलं आहे, असा प्रश्न ही त्यांनी केला आहे. सध्या शेतकरी लंप्पी अजारा मुळे परेशान झाला आहे, अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची पीके वाहून गेली आहेत आणि हे सांगतात की हे सरकार सर्वसामान्य जनतेचं सरकार आहे. पण, हे कसलं आलं सर्वसामान्य जनतेचं सरकार. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याचे आश्वासन दिले होते, पण एकाही शेतकरी बांधवाला मदत मिळाली नाही. गाजर दाखवायचे धंदे या सरकारने बंद केले पाहिजे असे फटकार विरोधी पक्ष नेत्यांनी सरकारला लगावला आहे.

हे महाराष्ट्र राज्य शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांवर चालणारे राज्य आहे. इथे गद्दारी चालणार नाही. राज्यात आतापर्यंत फक्त १८ मंत्र्यांचा शपथविधी झाला आहे. त्यामधील १२ मंत्र्यांनी चार्ज देखील घेतला नाही तर पुढच्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तारासाठी पितृपक्षाचं कारण दिलं जात आहे. असं वक्तव्य करत दादा भुसे यांच्या मंत्री पदावरून अजित पवारांनी टोला लावला आहे.

वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे राज्य सरकार विरोधात राष्ट्रवादीचे पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे आंदोलन सुरू आहे. त्याचबरोबर मुंबईमध्ये पण राष्ट्रवादीने आंदोलन केले आहे. पण वेदांता फॉक्सकॉन सेमीकंडक्टर प्रकल्पाने गुजरातला मोठा फायदा होणार असून महाराष्ट्राला मोठा फटका बसणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: वैभव शिरकुंडे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा