पुण्यातील पुरंदर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये १५ पैकी ६ ठिकाणी अजित पवार गटाचे वर्चस्व

पुरंदर, पुणे ६ नोव्हेंबर २०२३ : पुरंदर तालुक्यातील १५ ग्रामपंचायतीसाठी सरपंच आणि सदस्यांसाठी निवडणूक प्रकिया पार पडली. यातील तीन ग्रामपंचायती निवडणूक बिनविरोध पार पडली होती. सोमवारी सासवड येथे झालेल्या मतमोजणीमध्ये १३ पैकी ३ व आधीच बिनविरोध झालेल्या तीन अशा ६ ग्रामपंचायतींवर विजयी संपादन करीत अजित पवार गटान तालुक्यात आपलं वर्चस्व सिद्ध केल आहे. शिवसेना शिंदेगटाने ४ ग्रामपंचायती मध्ये विजय मिळविला असल्याचा दावा केला आहे. तर काँग्रेसचे आमदार संजय जगताप यांनी आपल्या विचारांच्या ५ ग्रामपंचायती आल्याचा दावा केला आहे. तर तीन ग्रामपंचायतींनी आपण निवडणूक स्थानिक मुद्द्यांवर लढलो असल्याच म्हणत कोणत्याही पक्षाच नाव आपल्यापुढे लावण्यास नकार दिला आहे. त्यामुळे दावे होत असले तरी आजूनही पक्षीय बलाबल अस्पष्ट आसल्याचे दिसून येत आहे.अजित पवार गटाने मात्र सहा ग्रामपंचायतीवर निर्विवाद विजय मिळवला आहे.

पुरंदर तालुक्यातील १५ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत स्थानिक आघाड्या करून निवडणूक लढवली गेली. महायुती सरकारच्या स्थापनेनंतर ही स्थानिक स्वराज्य संस्थेची पहिलीच निवडणूक असल्याने, राजकीय विश्लेषकांचे याकडे लक्ष लागलं होतं. पुरंदर तालुक्यातही ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटांनी मोठी बाजी मारल्याचे दिसून येत आहे. तर संजय जगताप यांच्या राष्ट्रीय काँग्रेसने सरपंचांची संख्या जरी कमी असली तरी सदस्य संख्येत मात्र बाजी मारल्याचे दिसून येते. बहुतांश ग्रामपंचायत मध्ये काँग्रेसला आघाडी आणि युती यांच्याशी सामना करावा लागला. त्यामुळे काँग्रेसला सरपंच पदावर जरी जास्त उमेदवार निवडून आणता आले नसले तरी, प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये प्रमुख विरोधक म्हणून काँग्रेसन आपलं स्थान बळकट केल आहे.

निवडून आलेले सरपंच पुढील प्रमाणे –
१) राजुरी:- भगत इर्षा प्रसाद 2) वीर:- मंजुषा संतोष ३) एकतपुर- मुंजवडी : टिळेकर शीतल किरण ४)माळशिरस:- यादव आरती ज्ञानेश्वर ५) गुळूंचे :- निगडे सम्राज्ञी कौस्तुभ ६) वागदरवाडी:- पवार सुनील संभाजी ७)कोथळे:- भोईटे जयश्री प्रकाश ८) वनपुरी : – कुंभारकर राजश्री नामदेव ९)उदाचीवाडी :- मगर सविता बाळासाहेब १०)कर्नलवाडी:- महानगर सुवर्णा तानाजी ११) रानमळा:- कुदळे वैशाली अरविंद १२)भोसलेवाडी:- शोभा शैला प्रवीण १३) सुकळवाडी:-संदेश दिलीप पवार १४)आदाचीवाडी:- सुवर्णा बजरंग पवार १५) वाल्हे:- अतुल गायकवाड

न्यूज अनकट प्रतिनिधी : राहुल शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा