पुणे, १८ जुलै २०२० : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह बोलणं आणि सोशल मिडियावर त्यांची बदनामी करणं एका महिलेला चांगलंच महागात पडलं आहे. शिक्रापूर पोलिस स्थानकात तिच्या विरोधात गुन्हा नोंद केला गेला आहे.
गेल्या आठवड्यात अजित पवार यांनी सारथीच्या प्रश्नांवर मंत्रालयात एक बैठक बोलावली होती.या बैठकीला छत्रपती संभाजीराजे, विजय वडेट्टीवार, विनोद पाटील उपस्थित होते. या बैठकीनंतर अजित पवारांनी सारथीसाठी ८ कोटी रूपयांचा निधी जाहीर केला.यानंतर त्याच रात्री एका महिलेने सोशल मीडियावर लाईव्ह करत अजित पवार यांची बदनामी केल्याचे समोर आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते स्वप्निल गायकवाड यांच्या निदर्शनास संबंधित महिलेने केलेले लाईव्ह आल्यानंतर त्यांनी शिक्रापूर पोलिस स्थानकात फिर्याद दिली. त्यानंतर पुढील कार्यवाही करून पोलिसांनी त्या महिलेविरोधात गुन्हा नोंद केला आहे.
याविषयी बोलताना गायकवाड म्हणाले,अजितदादा पवार तसंच राष्ट्रवादीच्या आमच्या कोणत्याही नेत्याची बदनामी आम्ही सहन करून घेणार नाही. इथून पुढच्या काळामध्ये आपण काय बोलतोय आणि कुणावर बोलतोय याचं भान ठेवावं.
न्यूज अनकट प्रतिनिधी