शरद पवारांच्या खालावलेल्या प्रकृतीबाबत अजित पवारांची प्रतिक्रिया

26

पुणे २६ जानेवारी २०२५ : महाराष्ट्राचे जेष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रकृती खालावल्याने त्यांनी नियोजित चार दिवसांचे कार्यक्रम रद्द केले होते. शरद पवारांना खोकला येत असल्याने त्यांना बोलण्यास अडथळा येत होता. एका जाहीर सभेत ते भाषण देत होते, तेव्हा त्यांना नीट बोलता सुद्धा येत नव्हते. त्यानंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना विश्रांती घेण्याचे सांगितले आहे.

आज उपमुख्यमंत्री पुण्यातील पोलीस संचालक ग्राउंडवरती ७६ व्या प्रजासत्तरक दिनानिमित्त ध्वजारोहणासाठी आले होते. त्यानंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी शरद पवारांच्या प्रकृतीविषयी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी ते म्हणाले कि, वसंतदादा शुगर इन्टीट्यूटच्या सभेच्या कार्यक्रमात ज्यावेळी शरद पवार उपस्थित होते तेव्हा त्यांना बोलताना अडचणी येत होत्या. त्याचवेळी आम्ही त्यांना विश्रांती घेणास सांगितले होते परंतु, मला पुढे कोल्हापूरला जायचे आहे असे साहेब म्हणाले व कोल्हापूरला रवाना झाले. “मात्र,तिथे गेल्यानंतर त्यांना अजून त्रास व्हायला लागला. मग तिथून ते मुंबईला गेल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. त्याप्रमाणे ते विश्रांती घेत आहेत.” अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली.

बारामती येथील वसंतदादा शुगर इन्स्टिटयूटची वार्षिक सभा शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सहकार मंत्री बाबासाहेब पाटील,आमदार दिलीप वळसे पाटील, आमदार जयंत पाटील, आमदार राजेश टोपे तसेच आधी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. या वार्षिक सभेत शरद पवारांची आसन व्यवस्था अजित पवार यांच्या शेजारी करण्यात आली होती, याचवेळी अजित पवारांनी अधिकाऱ्यांना त्यांच्या नावाची प्लेट बदलायला सांगितली होती. त्यांनी केलेल्या कृतीवरून असे लक्षात येत कि त्यांनी शरद पवरांच्या बाजूला बसणं टाळल्याचे बोलले गेले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: प्रथमेश पाटणकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा