पुण्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती, उपसभापती निवडीत अजित पवारांच्या वर्चस्वाला धक्का

पुणे, दिनांक, ९ मे २०२३ -: पुणे जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात ओळखला जातो. परंतु पुणे जिल्ह्यातील,पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती, उपसभापती निवडणुकीमध्ये मागील २४ वर्षापासून वर्चस्व असलेल्या अजित पवारांच्या सत्तेला धक्का बसला आहे. या बाजार समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादीचे बंडखोर दिलीप काळभोर यांची तर उपसभापतीपदी भाजपचे रवींद्र कंद यांची निवड झाली आहे.

राज्यात नुकत्याच झालेल्या १४७ कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे निकाल जाहीर झाले. या निवडणुकीमध्ये मतदारांनी सत्ताधारी पक्षातील अनेक दिग्गज आमदार, खासदार, मंत्र्यांनाही आपले स्वतःचे परीक्षण करणारा निकाल दिला आणि महाविकास आघाडीला जास्तीत जास्त जागा निवडून दिल्या. परंतु आज झालेल्या सभापती, उपसभापती निवडीमध्ये पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी राष्ट्रवादीचे बंडखोर दिलीप काळभोर आणि भाजपचे रवींद्र कंद यांची वर्णी लागल्यामुळे भाजपने बंडखोराच्या मदतीने कृषी उत्पन्न बाजार समिती ताब्यात घेतली आहे. राष्ट्रवादीच्या अधिकृत पॅनल विरोधात बंडखोरला बरोबर घेऊन भाजपने सत्ता हस्तगत केल्यामुळे अजित पवारांना हा मोठा धक्का मानला जातो.

पुणे जिल्ह्यामध्ये बाजार समितीच्या सहा पैकी पाच बाजार समित्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने विजय मिळवला आहे. पुणे जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असल्यामुळे, पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. राष्ट्रवादी काँग्रेसने सुरुवातीपासूनच उमेदवारी वाटपापासूनच इथे आयात उमेदवारांना प्राधान्य दिल्याने बंडखोरीचा सामना करावा लागला. आणि अवघ्या दोन जागांवरती समाधान मानावे लागले होते.

न्युज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा