अजितदादांच्या त्या ट्विटनं अनेकांना पुन्हा आठवला ”पहाटेचा शपथविधी” 

पुणे, २५ सप्टेंबर २०२०: राजकारणातले जादूगार म्ह्णून ओळखले जाणारे राष्ट्रवादीचे महत्वाचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आपल्या सडेतोड वक्तव्यांसाठीही प्रसिद्ध आहेत. आज भारतीय जनसंघाचे सहसंस्थापक आणि ज्येष्ठ नेते स्वर्गीय पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृती जागवणारं ट्वीट अजितदादांनी केलं होतं. मात्र, काही वेळातच त्यांनी ते ट्वीट डिलीट केलं. यावरून राजकारणात जोरदार चर्चा रंगली आहे.

राष्ट्र्वादीतल्या पावरफुल नेत्यानं विरोधी विचारसरणीतल्या भारतीय जनसंघाच्या दिवंगत नेत्याला जयंतीनिमित्त अभिवादन केल्यानं राजकीय वर्तुळात उलटसूलट चर्चा तर सुरू झाली. त्यामुळे अजितदादांचं भाजपप्रेम अजूनही कायम आहे अशी चर्चा सुरु झाली आहे. सोशल मीडियावर अनेक मिम्स शेयर केले जात असून अनेकांना अजितदादांनी घेतलेल्या ”त्या पहाटेच्या शपथविधीची” आठवण झाली आहे. मात्र अजित पवारांनी याबाबत सारवासारव केली आहे. 

अजित पवारांची सारवासारव 

आपलं ट्विट डिलीट केल्यानंतर माध्यमांनी चिचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना अजित पवार म्हणाले कि, ”समाजकारण, राजकारण करत असताना कधी कधी वरिष्ठांचं पण ऐकावं लागतं, असं अजित पवार यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं. ज्या व्यक्ती हयात नाहीत, त्यांच्याबाबत आपण चांगलं बोलतो ही आपली संस्कृती आहे, आपली परंपरा आहे. त्यानुसार मी हे ट्वीट केलं होतं.” अस अजित पवार यांनी यावेळी सांगितलं.  

न्यूज अनकट प्रतिनिधी: अक्षय बैसाणे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा