गोल पोस्ट महाराष्ट्र अजितदादा आणि माझ्यात कधीच वाद होणार नाही, प्रतिक्रिया देताना सुप्रिया सुळे झाल्या...

अजितदादा आणि माझ्यात कधीच वाद होणार नाही, प्रतिक्रिया देताना सुप्रिया सुळे झाल्या इमोशनल

मुंबई, ३ जुलै २०२३: राष्ट्रवादीतून बाहेर गेलेले सर्वजण हे आमचे नुसते सहकारी नसुन माझ्या कुटुंबातील लोक आहेत. अजित पवार यांच्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील महत्त्वाच्या नऊ नेत्यांनी देखील मंत्री पदाची शपथ घेतली आहे. यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अशी भावनिक प्रतिक्रिया दिली.

अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, त्यानंतर पहिल्यांदाच प्रतिक्रिया देताना सुप्रिया सुळे इमोशन झाल्या. अजित दादाशी मी कधीही वाद घालणार नाही असे सांगताना त्या पुढे म्हणाल्या की, शरद पवारांनी पक्षातील सर्वांना घरातील सदस्यांसारखे वागवले, ते सर्वांसाठी अतिशय प्रिय आहे. ही झालेली घटना आम्हाला जास्त वेदना देणार नाही, पण या घटनेची काही कारणे असतील. आता परिस्थिती जरी अशी घडली असली तरी, अजित दादाशी मी कधीही वाद घालणार नाही. त्यांच्यात आणि माझ्यात वाद होणार नाही, ते माझे मोठे भाऊ आहेत. पण आता पक्षाची जबाबदारी माझ्यावर आली आहे, त्यामुळे पक्षकार्य करताना वेगळी जबाबदारी पार पाडावी लागेल, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

संघर्ष हा प्रत्येकाच्या आयुष्यात येतो, त्यातून निघण्याचा दुसरा एक मार्ग असतो. हा दुसरा मार्ग नव्या उमेदीने उभा करायचा असतो, त्या साठी शरद पवारांचा आश्वासक चेहरा, हे मार्गदर्शक ठरणार असल्याचे सुळे यांनी सांगितले. संघटना आता पुन्हा एकदा नव्या उमेदीने उभी करायची आहे. लोकांबरोबर पुढे जात देशाची सेवा करत चांगले काम उभे करायचे आहे. आता ही आमच्या सर्वांची जबाबदारी आहे असे सुप्रिया सुळे यांनी यावेळी सांगितले.

न्युज अनकट प्रतिनिधी : गुरुराज पोरे.

error: Content is protected !!
Exit mobile version