अजितदादा उत्तर सभा घेतायत म्हणजे राष्ट्रवादी १०० टक्के फुटली, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा दावा

मुंबई, २७ ऑगस्ट २०२३ : राष्ट्रवादी पक्षात झालेल्या बंडखोरीनंतर शरद पवार विरुद्ध अजित पवार असे गट पाहायला मिळत आहेत. दरम्यान शरद पवारांकडून अजित पवार गटाच्या महत्वाच्या नेत्यांच्या जिल्ह्यात सभा घेण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी बीडमध्ये अशीच सभा घेतली होती. त्यानंतर आता अजित पवार गटाकडून देखील बीड जिल्ह्यात उत्तर सभा घेतली जात आहे. यावर आज माध्यमांशी संवाद साधताना विरोधी पक्षनेते व काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार उपमुख्यमंत्री अजित पवार आज उत्तर सभा घेतायत म्हणजे राष्ट्रवादी १०० टक्के फूटली आहे, असे वक्तव्य केलं आहे. शरद पवारांच्या सभेला प्रतिसभा घेऊन उत्तर दिले जात आहे. त्यामुळे राष्ट्रवादी १०० टक्के फूटली आहे, असेच म्हणावे लागेल. राष्ट्रवादीचे ९ आमदार फुटून सत्तेत सामील झाले आहेत.

दरम्यान, काल बारामती येथे जाहीर सभेत आपण सत्तेसाठी नाही तर केवळ विकासासाठी सत्तेत सहभागी झाल्याचे अजित पवार म्हणाले होते. दरम्यान यावेळी देशात मोदींसारखे दुसरे नेर्तृत्व आता तरी नाही. हे सत्य नाकारून चालणारच नाही. मोदींसारखा काम करणारा दुसरा नेता या देशात नाही, असे अजित पवार म्हणाले होते. त्यावर विजय वडेट्टीवार बोलतात की अजित पवार म्हणतात पंतप्रधान मोदींसारखा काम करणारा कोणी नाही. त्यांना आत्ताच हा दृष्टांत का झाला? १०-२० वर्षांपूर्वी तो का झाला नाही हा प्रश्न आहे.

अजित पवार मी सत्तेसाठी गेलो नाही, हे सतत सांगत आहेत. पण खरी गोष्ट हि आहे कि,अजित पवार सत्तेसाठी नाही तर ईडीच्या भीतीनेच भाजपसोबत गेले आहेत. सत्ता ही सर्वोच्च, म्हणूनच पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय झाला असावा कारण मी यापूर्वीच मुख्यमंत्री झालो असतो असे वक्तव्य अनेकदा अजित पवार यांनी केले आहे. याचा अजितदादांच्या मनात मुख्यमंत्रीपदाची सुप्त इच्छा आहे. ती पूर्ण करण्यासाठी ते गेले असते तर समजू शकलो असतो. पण, अजित पवार काही मुख्यमंत्री झाले नाही. अजित पवार इकडून तिकडे आणि तिकडून इकडे गेले, पण, त्यांना उपमुख्यमंत्रीपदच मिळाले. त्यामुळे ते विकासासाठी आणि सत्तेसाठी नाही तर ईडीच्या भीतीनेच भाजपसोबत गेले, असे विजय वडेट्टीवार म्हणाले आहेत

अजित पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी आपली दुसरी सभा बीडमध्ये घेत अजित पवार गटावर जोरदार निशाणा साधला होता. त्याला प्रत्युत्तर म्हणून आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बीडमध्ये जाहीर सभा होत आहे. बंडानंतर अजित पवार यांची राज्यातील ही पहिलीच जाहीर सभा आहे. त्यामुळे ते या सभेत काय बोलणार? शरद पवारांना काही प्रत्युत्तर देणार का? याकडे अवघ्या राज्याचे लक्ष असणार आहे. बीडमध्ये आज होणाऱ्या जाहीर सभेमध्ये अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित मंत्री, शहरातील अण्णाभाऊ साठे चौकातून छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत एकाच व्हॅनमध्ये बसून येणार आहेत. चारही बाजूने सजवलेल्या या व्हॅनमध्ये अजित पवार यांच्यासह मंत्री छगन भुजबळ, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, दिलीप वळसे पाटील, सुनील तटकरे, हसन मुश्रीफ, अनिल पाटील, आदिती तटकरे, संजय बनसोडे यांच्यासह धनंजय मुंडे असणार आहेत.

स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावर होणाऱ्या जाहीर सभेपूर्वी रॅली काढली जाणार आहे. त्यामुळे या निमित्ताने अजित पवार गटाकडून बीडमध्ये आज जोरदार शक्तिप्रदर्शन पाहायला मिळण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आज बीड शहरात पहिल्यांदाच येत असून, बीड शहरामध्ये अजित पवार यांच्या स्वागतासाठी आणि सभेसाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : वैभव शिरकुंडे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा