गोल पोस्ट महाराष्ट्र पुणे ‘आगीनफुल’ ठरली सर्वोत्कृष्ट शॉर्टफिल्म, पटकावले लाखो रुपयांचे बक्षीस!

‘आगीनफुल’ ठरली सर्वोत्कृष्ट शॉर्टफिल्म, पटकावले लाखो रुपयांचे बक्षीस!

राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘अजितपर्व’ शॉर्टफिल्म स्पर्धेत ‘आगीनफुल’ या शॉर्टफिल्मने प्रथम क्रमांक मिळवून १ लाख ११ हजार १११ रुपयांचे भव्य बक्षीस जिंकले. रील्स विभागात ‘सावित्रीच्या लेकी’ ने बाजी मारत २० हजार रुपयांचे पारितोषिक मिळवले. या स्पर्धेला महाराष्ट्रातून ३५० हून अधिक शॉर्टफिल्म्स आणि १०० पेक्षा जास्त रील्समधून प्रचंड प्रतिसाद मिळाला.

अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ आणि अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्या हस्ते विजेत्यांना गौरवण्यात आले. यावेळी अनासपुरे यांनी मराठी सिनेमांना ‘प्राइम टाइम’ मिळवण्याची मागणी केली. झिरवाळ यांनी मराठी चित्रपटसृष्टीच्या अडचणी दूर करण्याचे आश्वासन दिले.

न्यूज अनकट प्रतिनिधी चैतन्य पगारे

error: Content is protected !!
Exit mobile version