अकासाचा हवाईमार्ग मोकळा…

9

२२ जुलै, २०२२: राकेश झुनझुनवाला यांच्या अकासाचे पहिले विमान उड्डाण घेणा असून ७ ऑगस्ट रोजी होणार आहे. आजपासून या हवाई तिकीटाचे बुकिंग सुरु झाले आहे. यात मुंबई- अहमदाबाद हे पहिले विमान उडणार असून मुंबई, बंगळूर, कोची आणि अहमदाबाद या चार ठिकाणी ही हवाई सेवा सुरु होणार आहे. इतर हवाई टेरीफच्या तुलनेत पाच ते सात टक्के स्वस्तात या एअरलाईन्सचे दर आहेत.

सुरुवातीला, मुंबई आणि अहमदाबाद दरम्यान दर आठवड्याला २८ साप्ताहिक उड्डाणे करतील. १३ ऑगस्ट २०२२ पासून, बेंगळुरू आणि कोची दरम्यान २८ साप्ताहिक उड्डाणे होतील. अकासा एअर फ्लाइटच्या बुकिंगबद्दल, सीईओ विनय दुबे म्हणाले की, फ्लाइटच्या तिकिटांची विक्री सुरू करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. त्यांनी म्हटले की, अकासा कडून एक कार्यक्षम ग्राहक सेवा, विश्वासार्ह नेटवर्क, अत्यंत परवडणारे भाडे, तसेच ग्राहकांना आवडेल असा इमर्सिव्ह फ्लाइंग अनुभव या विमानप्रवासाने मिळणार आहे.

विमान प्रवास हा कायम महागडा प्रवास म्हणूनच ओळखला जातो. मात्र अकासा हा प्रवास सर्वसामांन्यासाठी असून त्यातून ग्राहकांना फॅमिली प्रवासाचे सुख देण्याचा आमचा प्रयत्न आहे. अकासा एअर देशभरात अस्तित्वात असेल आणि मेट्रोला टियर २ आणि टियर ३ शहरांशी जोडण्यासाठी काम करेल. ते म्हणाले की, दर महिन्याला दोन नवीन विमाने ताफ्यात समाविष्ट केली जातील, त्यानंतर टप्प्याटप्प्याने नेटवर्कचा विस्तार करताना आणखी शहरे जोडली जातील. अकासा या एअरलाईन्सने सर्वसामान्यांचे विमानप्रवासाचे स्वप्न वास्तवात यायला सुरुवात झाली, असेच म्हणावे लागेल.

न्यूज अनकट प्रतिनिधी- तृप्ती पारसनीस

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा