वाढदिवसानिमित्त आकाश कुटे यांच्याकडून सिंधुताई सपकाळ यांच्या आश्रमाला ५१ हजाराची मदत.!

5

लोणी काळभोर, दि. १४ ऑगस्ट २०२०: रोजी वाढदिवसावर होणारा खर्च टाळून भाजप पुणे जिल्हा उपाध्यक्ष गणेश बापू कुटे यांचे छोटे बंधू आकाश कुटे यांनी वाढदिवसानिमित्त ज्येष्ठ समाजसेविका व अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांच्या आश्रमाला भेट देऊन एक महिना पुरेल इतका किराणा आणि रोख स्वरूपात ५१ हजार रुपयाची आश्रमाला मदत केली.

सिंधुताई सपकाळ यांनी कुटे यांना वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा दिल्या कुटे परिवारांचे सामाजिक कार्यात मोठे योगदान आहे व समाजासाठी आयुष्य वेचणाऱ्या सिंधूताई यांच्या आश्रमाला छोटीशी मदत करणे शक्य झाल्यामुळे मोठे समाधान मिळाले असल्याच्या भावना आकाश कुटे यांनी व्यक्त केले.

यावेळी भाजप पुणे जिल्हा उपाध्यक्ष गणेश बापू कुटे, उपसरपंच विक्रम कुटे, ग्रामपंचायत सदस्य शरद आव्हाळे, विशाल कुटे, अजित कुटे, अमोल कुटे, विकास कुटे, तुषार कुटे, मयूर भोसले, शुभम सातव, अजय तांबे, आदी उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी- ज्ञानेश्वर शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा