मुंबई : महाराष्ट्र विकास आघाडी सरकारचा खातेवाटपाचा गोंधळ अजूनही मिटलेला नाही. विस्तार होऊन पाच दिवस झालं तरी ठाकरे सरकारचं खातेवाटप जाहीर झालेलं नाही. आज, उद्या म्हणत आता थोड्याच वेळात खातेवाटप होईल असा दावाही शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदेंनी दुपारी केला होता. मात्र, आतापर्यंत खातेवाटप जाहीर झालेलं नाही. खातेवाटप झालं नसलं तरी मंत्रीमंडळाची संपूर्ण हाती लागली आहे. दरम्यान ही यादी राजभवनावर राज्यपालांच्या सहीसाठी गेली असल्याची देखील माहिती मिळाली आहे. महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीच्या सरकारच्या ३६ मंत्र्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र अद्याप चार दिवसानंतर काल खातेवाटपाला मुहूर्त लागलेला पाहायला मिळतोय. काल (३ जानेवारी) अखेर महाराष्ट्रातील मंत्र्यांच्या खातेवाटप जाहीर करण्यात आलंय. मात्र, याबाबतची अधिकृत घोषणा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या स्वाक्षरीनंतर केली जाणार आहे.
कोणत्या मंत्र्याला कोणते खाते : मुख्यमंत्री – सामान्य प्रशासन आणि कायदा व सुव्यवस्था अजित पवार – वित्त व नियोजन (अर्थमंत्री) जयंत पाटील – जलसंपदा छगन भुजबळ – अन्न व नागरी पुरवठा अनिल देशमुख – गृह दिलीप वळसे पाटील – उत्पादन शुल्क व कौशल्य विकास धनंजय मुंडे – सामाजिक न्याय हसन मुश्रीफ – ग्रामविकास बाळासाहेब पाटील – सहकार व पणन राजेंद्र शिंगणे – अन्न व औषध प्रशासन राजेश टोपे – आरोग्य जितेंद्र आव्हाड – गृहनिर्माण नवाब मलिक – कामगार, अल्पसंख्याक विकास एकनाथ शिंदे- नगर विकास सुभाष देसाई- उद्योग आदित्य ठाकरे-पर्यावरण अनिल परब-परिवहन उदय सामंत -उच्च तंत्र शिक्षण दादा भुसे- कृषी बाळासाहेब थोरात – महसूल अशोक चव्हाण – सार्वजनिक बांधकाम खातं नितीन राऊत – ऊर्जा विजय वड्डेटीवार – ओबीसी, खार जमिनी, मदत आणि पुनर्वसन के.सी.पाडवी – आदिवासी विकास यशोमती ठाकूर – महिला आणि बालकल्याण अमित देशमुख – वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक खातं सुनील केदार – दुग्ध विकास आणि पशुसंवर्धन वर्षा गायकवाड – शालेय शिक्षण अस्लम शेख – वस्त्रोद्योग,मत्स्य व्यवसाय आणि बंदरं सतेज पाटील – गृह राज्यमंत्री (शहर) विश्वजित कदम – कृषी आणि सहकार (राज्यमंत्री