अखेर राष्ट्रपती राजवटीची शिफारस झाली

मुंबई : राष्ट्रवादीने सत्ता स्थापनेसाठी राज्यपालांकडे वेळ वाढवून मिळण्याची मागणी केली आहे. त्यानंतर राष्ट्रपती राजवटीची शिफारस झाली आहे. राज्यपालांनी या संबंधीचे पत्र राज्यपालांनी जाहीर केले आहे. राज्यपालांनी राष्ट्रवादी पक्षाकडून आलेल्या पत्राची चाचपणी केल्या नंतर हा निर्णय घेतला. राष्ट्रवादीने पात्रात असे सांगितले होते की आज रात्री ८.३० वाजेपर्यंत आम्ही १४४ आमदार जमा करू शकत नाही. राष्ट्रवादीला सत्ता स्थापनेसाठी वेळ वाढवून हवा होता. या सर्वांवर विचार करून राज्यपालांनी राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा निर्णय घेतला. कारण भाजप सत्ता स्थापन करण्यात आज असमर्थ ठरणार होती.
राष्ट्रपती राजवट लागू झाली तरी कायद्यात अशी तरतूद असल्याचे सांगितले जातं आहे की, या नंतरही जर पक्ष १४४ चा आकडा राज्यपालांकडे देण्यास समर्थ होत असेल तर राष्ट्रपती राजवट लागू झाली तरी सत्ता स्थापनेचा दावा करू शकतो.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा