जगातला बलाढ्य देश म्हणून चीनकडे पाहिले जाते. पण हाच चीन जर डोईजड होऊ लागला, तर आपण कमी नाही , हे भारताने गलवानमध्ये तिरंगा फडकावून दाखवून दिले आहे. गेल्या काही काळापासून चीनच्या कुरापती सुरुच आहेत. त्यामुळे भारत आणि चीन यांच्यातील वाद वाढण्याची शक्यता आहे. गलवान आणि त्यांनंतर आता पॅंगॅागमध्ये चीन पूल बांधत असल्याची शक्यता भू-गुप्तवार्ता डॅमियन सायमन यांनी वर्तवली आहे. यांवर भारताकडून सुविधांमध्ये सतत वाढ करण्यात येत असून, डोंगराळ भागातील सर्व मार्ग खुले रहावेत, तसेच वाहतुक मार्ग उपलब्ध असावेत, यासाठी योग्य ती काळजी घेण्यात येत आहे. राष्ट्रीय रायफलच्या तुकड्या या ठिकाणी तैनात आहेत.
मात्र या सर्वांवरुन होणारे राजकारण जास्त धोकादायक आहे. राहुल गांधींनी ट्विटरद्वारे पुन्हा एकदा भाजपवर हल्ला करत सांगितले की, पंतप्रधानांचे मौन कानठळ्या बसवणारे आहे. आपल्या भूमीला यापेक्षा जास्त चांगल्या नेतृत्वाची गरज आहे. तसेच राज्यसभेचा खासदार अभिषेक सिंघवी यांनी चीनला गांभिर्यांने घेऊ नका , असा बेधडक सल्ला प्रसारमाध्यमांना दिला आहे. विरोधकांची यावरुन बुद्धी कळून येते. मात्र पंतप्रधान यावर काय उपाय करतात, किंवा काय पाऊल उचलतात, हे पाहणं गरजेचे आहे. भारताचे चिनी कुरापतींना जशास तसे उत्तर देऊन भारताने आपली ताकद, शौर्याचा नमुना चीनला दाखवून दिलाय, हे मात्र खरं.
न्यूज अनकट प्रतिनिधी- तृप्ती पारसनीस