मालेगाव, २२ ऑगस्ट २०२०: अखिल भारतीय विद्यार्थी परिषद मालेगाव जिल्ह्याचे २१ ऑगस्ट २०२० रोजी जिल्हा विद्यार्थी संम्मेलन ऑनलाइन पद्धतीने पार पडले. यावेळी अभाविपचे २०२०-२१ या शैक्षणिक वर्षाची मालेगाव जिल्हा समिती घोषित करण्यात आली. त्यात अभाविप मालेगाव जिल्हा प्रमुख प्राध्यापक दत्तात्रय शिंपी सर, जिल्हा संयोजक तेजस जाधव यांची निवड करण्यात आली.
यावेळी अभाविप मालेगाव जिल्ह्याची समिती घोषणा महाराष्ट्र प्रदेश जनजाती कार्यप्रमुख गितेश चव्हाण यांनी केली. यानंतर महाराष्ट्र प्रदेश सहमंत्री श्री सिद्धेश्वर लटपटे यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद मालेगाव जिल्हा आयोजित विद्यार्थी संमेलनात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत त्यांनी ऑनलाईन शिक्षण पद्धतीचा अवलंब केल्यानंतर विद्यार्थ्यांसमोर कोणती आव्हान असणार आहेत, त्यासोबत कोरोना महामारीच्या संकटावर मात करणे हेच अभाविपच्या कार्यकर्त्यांनी उद्दिष्ट असले पाहिजे असे कार्यकर्त्यांना जाणीवही करून दिली.
पुढील प्रमाणे जिल्हा समिती घोषणा करण्यात आली आहे. जिल्हा प्रमुख – प्रा. दत्तात्रय शिंपी सर, जिल्हा संयोजक – तेजस जाधव, जिल्हा सहसंयोजक – कामेश गायकवाड, जिल्हा सहसंयोजक – प्राजक्ता बच्छाव, जिल्हा कार्यालय प्रमुख – वैशाली पवार, जिल्हा कोष प्रमुख – नाहुष नेरपगार, जिल्हा कलामंच प्रमुख – प्रभू सोनवणे, जिल्हा आयाम प्रमुख- दीपक वाघ, जिल्हा एकलव्य प्रमुख – शिवानी बच्छाव, जिल्हा जनजाति कार्यप्रमुख – दीपक पवार, जिल्हा वस्तीगृह प्रमुख – शिवदास सूर्यवंशी, सोशल मीडिया संयोजक – शुभम लोंढे, सोशल मीडिया सहसंयोजक – अक्षय खैरना तसेच,
तालुका प्रमुख
मालेगाव – किरण शेलार
सटाणा – निखिल रौंदळ
देवळा – अनिकेत अहिरे
चांदवड – शिवम काटे जिल्हा समिती सदस्य
प्रा. सुरेश पाटील सर
प्रा. प्रवीण पाटील सर
सचिन लांबूटे
आदींची निवड करण्यात आली.
न्यूजअनकट प्रतिनिधी: प्रगती कराड