पिंपरी चिंचवड : महाराष्ट्र पोलीस यांच्या वतीने १३ व्या अखिल भारतीय पोलीस नेमबाजी (क्रीडा) स्पर्धेत पुरूषांच्या .२२/५० मिटर फ्री पिस्टल गटात बीएसएफच्या एस.के घोषने सुवर्णपदक पटकावले.
श्रीशिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत एस.के घोषने ५५०.०, १०x गुणांसह सुवर्णपदक पटकावले. एसएसबीच्या गौरव दागरने ५५०.० ८x गुणासह रौप्य तर एसएसबीच्याच विक्रम शिंदेने ५५०.०७ x गुणासह कांस्य पदक पटकावले.
सांघिक गटात एसएसबी संघाने १६४९.० गुणासह सुवर्ण पदक पटकावले. यात गौरव डागरने ५५०.० विक्रम शिंदेने ५५०.० तर प्रविण कुमारने ५४९.० गुण मिळवून देत संघाला सुवर्णपदक मिळवून दिले. बीएसएफ संघाने १६१६.० गुणा घेत रौप्य पदक पटकावले. यात एस.के घोषने ५५०.० रुपक मलिकने ५३५.० तर विवेक चौधरीने ५३१.० गुण मिळवले. सीआरपी संघाने १५८८.० गुण मिळवत कांस्य पदकाला गवसणी घातली. यात धिरेंद्र कुमार सिंगने ५३७.०,तुषार सिंगने ५२८.० तर गौरव कुमार सिंगने ५२३.० गुण मिळवले.
स्पर्धेचे पदक वितरण भारताची आंतरराष्ट्रीय नेमबाज (काॅमनवेल्थ गेम पदक विजेती) अर्जुन पुरस्कार प्राप्त हिना सिध्दु यांच्या हस्ते तसेच शसंदीप बिष्णोई ,पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड यांच्या हस्ते करण्यात आले.