गोल पोस्ट स्पॉटलाइट नाटक अखिल भारतीय नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदी जब्बार पटेल

अखिल भारतीय नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदी जब्बार पटेल

मुंबई : अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदी रंगकर्मी डॉ. जब्बार पटेल यांच्या निवडीची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.
नाट्यसंमेलनाचं हे १०० वे वर्ष असल्याने नाट्यसंमेलनाचा अध्यक्ष कोण होणार? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं.
यापार्श्वभूमीवर अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांनी पटेल यांच्या नावाची घोषणा केली. संवेदनशील निर्माते आणि दिग्दर्शक असलेल्या पटेल यांनी मराठी सिनेसृष्टी आणि रंगभूमीला अत्यंत दर्जेदार सिनेमे आणि नाटक दिली आहेत. त्यांची अध्यक्षपदी निवड झाल्याने नाट्यसृष्टीतून आनंदाचे वातावरण आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version