गोल पोस्ट महाराष्ट्र पुणे ‘सखाराम बाइंडर’च्या टीमकडून महाराष्ट्रातील अतिवृष्टीग्रस्तांना मदत

‘सखाराम बाइंडर’च्या टीमकडून महाराष्ट्रातील अतिवृष्टीग्रस्तांना मदत

प्रसिद्ध लेखक विजय तेंडुलकर यांचे अजरामर नाटक ‘सखाराम बाइंडर’ प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांच्या प्रमुख भूमिकेत ‘सुमुख’ चित्रने पुन्हा रंगभूमीवर आणले आहे. नुकतेच या नाटकाचे दिल्लीतील दोन प्रयोग हाऊसफुल्ल सादर झाले असून, महाराष्ट्रातही या नाटकाचे अॅडव्हान्स बुकिंग जोरात सुरू आहे.

सध्या महाराष्ट्रातील अनेक भागात अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतकरी तसेच नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. ही बाब लक्षात घेऊन, सामाजिक भावनांना प्रोत्साहन देत नाटकाचे निर्माता आणि आर्यन्स ग्रुपचे CEO मनोहर जगताप यांनी दिल्लीतील प्रयोगांचे मानधन अतिवृष्टीग्रस्तांना देण्याची घोषणा केली.

अभिनेते सयाजी शिंदे आणि या नाटकाचे निर्माता मनोहर जगताप यांनी, सामाजिक भावनेतून महाराष्ट्रातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. सोबतच अभिनेते सयाजी शिंदे यांनी या नाटकाच्या पुढील १० प्रयोगांचे त्यांचे मानधन अतिवृष्टीग्रस्तांना समर्पित केले. हे पाऊल नाट्यकला आणि समाजसेवेचा सुंदर संगम ठरलं आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी गुरुराज

error: Content is protected !!
Exit mobile version