अक्कलकोट स्वामी समर्थांचे मंदिर २ जानेवारीपर्यंत राहणार बंद

सोलापूर, २६ डिसेंबर २०२०: ख्रिसमस आणि त्याला जोडून शनिवार आणि रविवार अशा सलग सुट्ट्या आल्यामुळे अनेक नागरिक बाहेर फेरफटका मारण्यासाठी निघत आहेत. त्यामुळे ठीक ठिकाणी नागरिक गर्दी करण्यास सुरुवात करत आहेत. याच पार्श्वभूमीवर अक्कलकोट मधील स्वामी समर्थांचे मंदिर दोन जानेवारी पर्यंत बंद राहणार आहे.
     नाताळ आणि सलग आलेल्या साप्ताहिक सुट्ट्यांमुळे स्वामी समर्थांच्या मंदिरामध्ये भाविकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेता मंदिर प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. त्यात २९ डिसेंबरला दत्त जयंती आहे. दरवर्षी दत्त जयंतीला अक्कलकोट मध्ये स्वामी समर्थांच्या मंदिरात भाविक मोठ्या संख्येने गर्दी करीत असतात. अद्याप करोनाचे संकट टळले नसल्यामुळे अक्कलकोट मंदिर प्रशासनाने दोन जानेवारी पर्यंत मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
     याबाबत मंदिर प्रशासनाने नागरिकांना आव्हान करत असे म्हटले आहे की, कोरोना चे दुसरे स्वरूप नुकतेच आले आहे. त्यामुळे सर्व भाविकांनी आणि भक्तांनी घरी राहूनच सहकार्य करावे. संसर्ग पासरण्या बाबत दक्षता घेत प्रशासनाने व जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत सूचना दिल्या आहेत.  या सूचनांचे पालन मंदिर प्रशासनाने करण्याचे ठरवले असून दोन जानेवारी पर्यंत मंदिर बंद राहणार आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा