अक्षय, अमिताभ आणि अनुपम पेट्रोल किमतींमुळे सोशल मीडियावर ट्रोल

मुंबई, २० फेब्रुवरी २०२१: प्रत्येकाची वेळ येत आसते आणि प्रत्येकाला आपली भडास काढण्याची वेळ मिळत आसते. बाॅलिवूड आधीपासूनच अनेक गोष्टींमुळे बदनाम आहे. कलाकार कुठल्या विषयावर बोलले तरी चर्चा होते आणि नाही बोलले  तरी देखील  त्यांच्यावर ताशेरे ओढले जातात. आशीच काही परिस्थिती अमिताभ बच्चन, अनुपम खेर आणि अक्षय कुमारची झाली आहे. जिथे काँग्रेस समर्थक त्यांना भाजपचे दलाल बोलत आहेत.
गोष्टच अशी आहे की देशात पेट्रोल ने शतक मारले आहे आणि आता पुढे ता शतकाचे रूपांतर कुठेपर्यंत जाईल  हे कोणालाही माहिती नाही. तसे पेट्रोल डिझेलच नाही तर अनेक आयुष्यातील महत्वाचा भाग आसलेल्या वस्तूंचे भाव वाढले आहेत. ज्याला सरकार  कोरोनाचे आणि लाॅकडाऊन चा परिणाम सांगत आहे.
तर अक्षय, अमिताभ आणि अनुपम यांनी २०१२ साली काँग्रेसचेसरकार आसताना पेट्रोल ला घेऊन ट्विट केले होते. ज्या मधे अक्षय ने म्हटले होते. “आता असं वाटतंय  सायकल साफ करून रस्त्यावर चालवण्याची वेळ आली आहे.” सूत्रांनुसार जास्त गदारोळ झाल्यावर आणि भाव आणखी वाढणार आसल्याने अक्षयने ते ट्विट डिलीट केले.
तर काँग्रेस सरकारच्या काळात बीग बी ने २०१२ मधे ट्विट करत लिहीले होते.”पेट्रोल चे भाव ७.५ रूपयांनी वाढले आहे. पंप अटेंडेंट ने विचारले कितीचे पेट्रोल टाकू? मुंबई मधे राहणारा : २-४ रूपयांचे कारवर स्प्रे कर भावा गाडी जाळायची आहे.”
तर अभिनेता अनुपम खेर ने ही २०१२ मधे एक गोष्ट सांगत काँग्रेस सरकारवर ताशेरे ओढले होते. “मी ड्रायव्हरला विचारले तू उशिरा का आला तो म्हणाला मी सायकलवरून आलो आहे. मी विचारले का? तर तो म्हणाला मी गाडीला शोपीस बनवून ठेवले आहे.”
मग काय लोकांना फक्त  संधी हवी होती आणि ती आता मिळाली जेव्हा काँग्रेसचे सरकार होते. तेव्हा पेट्रोलवर भरपूर ज्ञान पाजळत होते. आता भाजपचे सरकार आहे तर तोंडावर टाळे बसवले. असे लोक ट्रोल करू लागले. तर काही लोकांनी हे भाजपचे दलाल तर भाजपचे पोपट आणि  त्यांचे पाळतू कुत्रे म्हणून  ही जहरी टिका करण्यात येत आहे.सध्या देशातील लोकांनी त्यांना वाटेल तसे ते या अभिनेत्यांवर भडास काढत आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा