अक्षय कुमार जगातील सहाव्या क्रमांकाचा श्रीमंत अभिनेता आहे..अनुराग कश्यप

13

मुंबई:९ऑगस्ट: २०२२; नुकत्याच एका मुलाखतीत अनुराग कश्यपने खुलासा केला की अक्षय कुमार जगातील सहाव्या क्रमांकाचा श्रीमंत अभिनेता आहे. तापसी पन्नू आणि अनुराग कश्यप त्यांच्या आगामी ‘दोबारा’ या चित्रपटाचे प्रमोशन करत आहेत. मुलाखतीदरम्यान, सिद्धार्थ कन्ननने तापसीला सांगितले की, त्याने अनेक चित्रपट केल्याबद्दल तापसीला ‘अक्षय कुमार’ म्हणून संबोधणारे ट्विट वाचले. तेव्हा तापसीने तक्रार केली की तिचा पगाराचा चेक त्याच्याशी जुळत नाही आणि तो खूप कमावतो. तेंव्हा अक्षय हा जगातील सहाव्या क्रमांकाचा श्रीमंत अभिनेता असल्याचे अनुरागने सांगितले.

फोर्ब्स इंडियाच्या मते, २०१९ मध्ये फोर्ब्स यूएसच्या जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या सेलिब्रिटींच्या यादीत अक्षय कुमार हा एकमेव भारतीय होता. $६५ दशलक्ष (₹ ५१७कोटी) कमाईसह तो ३३ व्या क्रमांकावर होता. सध्या,अक्षय जगातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांमध्ये सहाव्या क्रमांकावर आहे. अक्षयच्या कमाईतील बहुतेक उत्पन्न हे त्याच्या जाहिरातींद्वारे येते.

दोबाराचे दिग्दर्शन अनुराग कश्यपचे आणि निर्मिती एकता कपूर ची आहे. हा चित्रपट १९ ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे. मनमर्जियां आणि सांड की आंख या चित्रपटानंतर अनुराग आणि तापसी यांच्या जोडीचा हा तिसरा चित्रपट आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: गुरुराज पोरे.