अक्षय कुमारच्या ‘स्काय फोर्स’ या नवीन चित्रपटाची घोषणा

मुंबई, २ ऑक्टोंबर २०२३ : सध्या बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार त्याच्या आगामी ‘मिशन रानीगंज’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. आज महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त अक्षय कुमारच्या नवीन चित्रपटाची घोषणा करण्यात आली. ‘स्काय फोर्स’ असे त्याच्या आगामी चित्रपटाचे नाव आहे. चित्रपटाच्या घोषणेसोबतच चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर करण्यात आली. चित्रपटाची कथा भारतातील पहिल्या आणि सर्वात प्राणघातक हवाई हल्ल्याच्या सत्य घटनेवर आधारित आहे.

दिनेश विजन, ज्योती देशपांडे आणि अमर कौशिक संयुक्तपणे ‘स्काय फोर्स’ चित्रपटाची निर्मिती करणार आहेत, ज्याचे दिग्दर्शन संदीप केवलानी आणि अभिषेक कपूर करणार आहेत. हा चित्रपट २ ऑक्टोबर २०२४ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाशिवाय अभिनेता अक्षय कुमार ‘मिशन रानीगंज’ मध्येही दिसणार आहे. टिनू सुरेश देसाई दिग्दर्शित ‘मिशन राजीगंज’ या चित्रपटात अक्षय कुमारसोबत परिणीती चोप्राही मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

‘मिशन राणीगंज’ या चित्रपटात अक्षय कुमार आणि परिणीती चोप्रा यांच्याशिवाय कुमुद मिश्रा, दिव्येंदू भट्टाचार्य, पवन मल्होत्रा, मुकेश भट्ट, अक्षय वर्मा, इश्तियाक खान, दिनेश लांबा आणि वीरेंद्र सक्सेना हे देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. ‘मिशन रानीगंज: द ग्रेट भारत रेस्क्यू’ हा चित्रपट ६ ऑक्टोबर २०२३ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा