गोल पोस्ट स्पॉटलाइट सिनेमा आलिया भट्ट ने दिली गूड न्यूज

आलिया भट्ट ने दिली गूड न्यूज

मुंबई, १९ ऑक्टबर २०२२ : सध्या आलिया भट्ट कडे सेलिब्रेशन ची कमी नाहीये. पहिले ब्रह्मास्त्र सिनेमा ला बॉक्स ऑफिसवर मिळालेल यश, त्यानंतर नुकतच तीचं डोहाळजेवण साजर करण्यात आलं आणि आता सेलिब्रेशनचं कारण म्हणजे बॉलिवूड फिल्म इंडस्ट्री मधे पूर्ण झालेलं तिचं दशक.

इंस्टाग्राम पोस्ट व्दारे आजच तीने ही गोड बातमी तीच्या चाहत्यांसोबत शेअर केली. आलिया ही अशी अभिनेत्री आहे जीने तीच्या पहिल्या सिनेमापासूनच प्रेक्षकांची मनं जिंकली आणि इंडस्ट्री मधे स्वतःची एक जागा निर्माण केली. आलियने तीच्या फिल्मी करिअरची सुरुवात “स्टुडंट ऑफ द ईयर” या सिनेमातून केली. १९ ऑक्टोबर २०१२ रोजी ही फिल्म प्रेक्षकांच्या भेटीला आली. त्या वेळी आलिया फक्त १९ वर्षांची होती. एवढ्या लहान वयात तिने फिल्मी दुनियेतलं यश अनुभवलच पण त्याच सोबत जेव्हा ती “कॉफी विथ करन” या शो चा हिस्सा झाली तेव्हा तीच्या चुकीच्या उत्तरांमुळे टीकेला सामोरे जावे लागले होते. पण तीच आलिया आज एक ब्रँड बनलीय आणि बॉलिवूड च्या टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे.

या १० वर्षात आलिया ने अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केले आहे. प्रत्येक सिनेमातून तिची एक वेगळी छाप आपल्याला पाहायला मिळाली. हायवे, उडता पंजाब, राजी, डियर जिंदगी, गंगुबाई काठीयावाडी हे तिचे काही गाजलेले चित्रपट.

न्यूज अनकट प्रतिनिधी : केतकी कालेकर

error: Content is protected !!
Exit mobile version