मुंबई : अलिबाग येथे सहावे अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. दि. ८ आणि ९ फेब्रुवारीला कुरुळ येथील क्षात्रक्य समाज सभागृहात होणाऱ्या या संमेलनास देशभरातील शेतकरी साहित्यिक सहभागी होणार आहेत. या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शेतकरी साहित्यिक भास्कर चंदनशिव असणार आहेत. उद्घाटन सोहळ्यास खासदार संजय राऊत उपस्थित राहणार असल्याची माहिती शेतकरी साहित्य चळवळीचे संस्थापक गंगाधर मुटे यांनी दिली. अशी माहिती एका वृत्तपत्राने प्रसिद्ध केली आहे.
शेती साहित्याचा शेती मधल्या प्रत्यक्ष वास्तवाशी नाळ जोडण्यासाठी, सांप्रत शेती व्यवसायाला भेडसावणाऱ्या दाहक समस्यांची मराठी साहित्य विश्वाला जाणीव करून देण्यासाठी, नवसाहित्यिकांना सशक्त व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी व शेतीच्या व्यथा मांडणारी साहित्य चळवळ निर्माण करण्याच्या दृष्टीने या संमेलनाचे आयोजन करण्यात येते
या शेती साहित्य संमेलनाचे उदघाटन एबीपी माझा वाहिनीचे संपादक राजीव खांडेकर, खासदार सुनील तटकरे, माजी आमदार सरोजताई काशीकर, ऍड. सतीश बोरुळकर, प्रमुख अतिथी म्हणून तर स्वागताध्यक्ष मा. अॅड. प्रदीप पाटील, कार्याध्यक्ष गंगाधर मुटे हे उपस्थित राहणार आहेत.