उत्तर प्रदेशच्या सर्व १७ महापालिका भाजपकडे

लखनौ, १४ मे २०२३: उत्तर प्रदेशातील सर्व १७ महापालिका भाजपने जिंकल्या असून, सपा, बसप आणि कॉग्रेसला खातेही उघडता आले नाही. गोरखपूर, प्रयागराज, वाराणसी, मेरठ, फिरोजाबाद, बरेली, अलीगड, गाझियाबाद, अयोध्या, शहाजहानपुर, कानपूर, झाशी, लखनौ, आग्रा, मुरादाबाद, सहारनपूर, मथूरा -वृंदावन अशा सर्व महापालिका भाजपने जिंकल्या आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आपले वर्चस्व पुन्हा सिद्ध केले आहे.

भाजपच्या प्रमिला पांडे कानपूर महापालिकेत दुसऱ्यांदा महापौर झाल्या आहेत. लखनौमध्ये भाजपच्या सुषमा खरकवाल यांनी सपच्या वंदना मिश्रा यांचा पराभव केला. प्रयागराज मध्ये भाजपचे उमेशचंद्र गणेश केसरवानी यांनी सप उमेदवार अजय कुमार श्रीवास्तव यांचा पराभव केला आहे. यामुळे उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा एकदा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एकहाती भाजपची सत्ता स्थापन केली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा