नवी दिल्ली:18 जानेवारी 2022: कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांमध्ये सध्या कोणताही दिलासा नाही. बहुतेक कोरोना रुग्णांना Omicron प्रकाराची लागण झालीय. ओमिक्रॉनच्या लक्षणांमध्ये विविध बदल दिसून आले आहेत. ही लक्षणं प्रत्येक रुग्णामध्ये वेगवेगळ्या प्रकारे दिसतात. यूकेचा ZOE कोविड अभ्यास ओमिक्रॉनच्या सर्व 20 लक्षणांची माहिती देतो. यासोबतच ही लक्षणं शरीरात किती दिवस सुरू होतात आणि किती काळ टिकतात हेही सांगण्यात आलंय. ओमिक्रॉनच्या बहुतांश रुग्णांमध्ये ही लक्षणं दिसून येत आहेत.
शीर्ष 20 ओमिक्रॉन लक्षणे-
1.डोकेदुखी
2. वाहणारं नाक
3. थकवा
4. शिंका येणं
5. घसा खवखवणं
6. सततचा खोकला
7. कर्कश आवाज
8. थंडी वाजून येणं किंवा थरथरणं
9. ताप
10. चक्कर येणं
11. ब्रेन फॉग
12. सुगंध बदल
13. डोळा दुखणं
14. गंभीर स्नायू दुखणं
15. भूक नसणं
16. गंधाचा अभाव
17. छातीत दुखणं
18. ग्रंथींना सूज येणं
19. कमकुवतपणा
20. वचेवर पुरळ उठणं
ही लक्षणं किती काळ टिकतात-
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, ओमिक्रॉनची लक्षणं डेल्टाच्या तुलनेत अधिक वेगानं दिसून येतात आणि त्यांचा उष्मायन कालावधीही कमी असतो. Omicron रुग्णांमध्ये, संसर्ग झाल्यानंतर 2 ते 5 दिवसांनी लक्षणं दिसतात. ब्रिटिश एपिडेमियोलॉजिस्ट टिम स्पेक्टर यांच्या मते, ओमिक्रॉनची सामान्य सर्दीची लक्षणं सारखीच असतात, जी सरासरी 5 दिवस टिकतात. तथापि, निर्बंध, सामाजिक अंतर आणि मास्क परिधान यांचा मोठा प्रभाव पडतो आणि त्यामुळं फ्लूचे रुग्णही कमी झाले आहेत.
टीम स्पेक्टर म्हणतात की, ओमिक्रॉनची लक्षणं डेल्टाच्या तुलनेत कमी दिवस टिकतात. लोकांमध्ये, विशेषत: पहिल्या आठवड्यात लक्षणं फारच कमी काळ दिसून येतात. जर 5 दिवसांनी लोक चाचणीत नकारात्मक आले तर याचा अर्थ या 5 दिवसात ही लक्षणं आली आणि गेली. म्हणजेच, ते जितक्या वेगानं दिसतात तितक्या वेगानं जातात. बहुतेक लोकांमध्ये, ओमिक्रॉनची लक्षणं 3 ते 5 दिवस टिकतात. लसीकरण केलेल्या लोकांमध्ये त्याची लक्षणं सौम्य असतात. ज्यांनी कोरोना लसीचा एकही डोस घेतलेला नाही अशा लोकांमध्ये ओमिक्रॉन जास्त गंभीर आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे