ऑल-इलेक्ट्रिक ‘महिंद्रा XUV400’ जानेवारी २०२३ मध्ये होणार लॉन्च, सिंगल चार्जवर ४५६ किमी धावणार

नवी दिल्ली, १० सप्टेंबर २०२२: महिंद्रा कंपनीे ऑल-इलेक्ट्रिक ‘महिंद्रा XUV400’ बाजारात आणणार आहे. नवी दिल्लीतील भव्य कार्यक्रमात कंपनीच्या प्रमुखांनी कारच्या प्रमुख वैशिष्ट्यांबद्दल माहिती दिली.

Tata Nexon EV शी स्पर्धा करणारी ‘महिंद्रा XUV400’ जानेवारी २०२३ मध्ये लॉन्च केली जाणार आहे. एका सिंगल चार्जमध्ये ही कार ४५६ किमी धावेल. सर्वात रुंद सी-सेगमेंटच्या वाहनाला स्पोर्टी मोडसह तीन इंटिलिजन्ट ड्रायव्हिंग मोड असतील. त्याचा टॉप स्पीड १६० किमी/ताशी असल्याचे महिंद्रा कंपनीकडून सांगण्यात येतंय.

नॉन-लक्झरी सेगमेंट कारमध्ये सर्वात वेगवान प्रवेग ही कार असेल. ० ते १०० किमी पर्यंतचा वेग ८.३ सेकंदात गाठला जाईल. C-SUV चा टॉप स्पीड १६० किमी/तास आहे. ३१० Nm चे सर्वोत्कृष्ट टॉर्क आउटपुट उपलब्ध असणार.

इंटेलिजेंट ड्राइव्ह मोड असलेल्या या कारची किंमत जाहीर झालेली नाही. महिंद्राने आपल्या सोशल मीडिया हँडलवरून सांगितले की, हे लवकरच रिलीज केले जातील. आर्क्टिक ब्लू आणि नेपोली ब्लॅक कलर शो अधिकृत वेबसाइटवर केले गेले. पण, ही कार आर्क्टिक ब्लू, एव्हरेस्ट व्हाईट, गॅलेक्सी ग्रे, नेपोली ब्लॅक आणि इन्फिनिटी ब्लू रंगांमध्येही उपलब्ध असेल. छतावर ड्युअल टोनचा पर्याय असेल, ज्याला सॅटिन कॉपर फिनिश मिळेल.

१८२१ MM रुंदी असलेली ४२०० एकूण लांबीची ही कार, धूळ आणि जलरोधक आहे. २६०० MM व्हीलबेस, ३७८ लीटर बूट स्पेस, इलेक्ट्रिक स्टीयरिंग, थ्रॉटल आणि रीजनरेशन रिस्पॉन्स सिस्टम देखील उपलब्ध असेल. नवीन एलईडी टेल लॅम्पमध्ये कॉपर देखील घालण्यात येईल.

न्युज अनकट प्रतिनिधी : गुरूराज पोरे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा