गोल पोस्ट महाराष्ट्र अखिल भारतीय जर्नलिस्ट फेडरेशन सोलापूर ; अध्यक्ष व खजिनदार पदे घोषित

अखिल भारतीय जर्नलिस्ट फेडरेशन सोलापूर ; अध्यक्ष व खजिनदार पदे घोषित

सोलापूर, दि. ९ जुलै २०२०: अखिल भारतीय जर्नलिस्ट फेडरेशनचे नॉर्थ इंडिया व्हाईस प्रेसिडेंट फिरोज पिंजारी, नँशनल चेअरमन राजेश द्विग्विजय सिंह, आनंद कुमार, रामलाल साहु, प्रि.अब्रहम यांनी नुकतेच सोलापूर जिल्हा नियुक्त्या जाहिर केल्या. यामध्ये सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष पदी शाहरुख मुलाणी तर खजिनदार पदी गणेश देशमुख देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली.

अखिल भारतीय जर्नलिस्ट फेडरेशनच्या ऋषीकेश मुळे व रविंद्र गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली आणि महाराष्ट्र राज्य कार्यकारणी सदस्य कमलेश शेवाळे यांच्या सहकार्याने शहारुख मुलाणी व गणेश देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली.

निवड झाल्यानंतर उपाध्यक्ष शाहरुख मुलाणी व खजिनदार गणेश देशमुख यांनी बोलताना सांगितले की, सोलापूर जिल्ह्यातील सर्व तळागळातील पत्रकार बांधवांना एकत्रीत करुन अखिल भारतीय जर्नलिस्ट फेडरेशन संघटनेत काम करण्यास प्रेरित करु व पत्रकार बांधवांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करत राहू असे सांगीतले. यावेळी अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

अखिल भारतीय जर्नलिस्ट फेडरेशन ही संघटना पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी व अन्यायाविरुद्ध वाचा फोडण्याचे काम करते. या नियुक्तीमुळे शाहरुख मुलाणी व गणेश देशमुख यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: प्रदीप पाटील

error: Content is protected !!
Exit mobile version