नवी दिल्ली, २९ मे २०२१: सध्या अनेक देशांमध्ये कोरोना वर रामबाण औषध म्हणून लसीकरणावर जोर देण्यात येत आहे. तर लसीकरणाचे फायदे देखील अनेक देशांत दिसून आले आहे. लसीकरणामुळे कोरोना रुग्ण संख्येत घट तर मृत्यू दरात ही यामुळे फायदा होत असल्याचे समोर आले आहे. ज्या मुळे भारत सरकार देखील आता लसीकरणावर अधिक भर देणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
भारतात डिसेंबर २०२१ पर्यंत सर्व भारतीयांचे लसीकरण होईल असे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे. केेंद्रिय आरोग्य मंत्रालयनं २१६ कोटी लसींच्या डोस उत्पादनाचं रोडमॅप सादर केलंय. आत्तापर्यंत देशात २० कोटी पेक्षा जास्त नागरिकांचे लसीकरण झाले आहे असही ते म्हणाले. तसेच राहूल गांधीवर ते निशाणा साधत राजस्थानच्या परिस्थिती वर भाष्य केले.
केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी वॅक्सिनेशनला घेऊन केलेल्या वक्तव्याबद्दल देशातील अनेक नागरिक संतापल्याचे बघायला मिळाले. ज्यांनी प्रकाश जावडेकर यांच्या वर सोशल मीडियावर सडकून टिका केल्याचे दिसले. “पेहले टीकाकरण सुरु करो बाद में फेकाफेक करो” ,”हिंदी नीट बोलायला शिका आधी”.अशी टीका होत आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव