बारामती शहरात शेतकरी आंदोलनाला सर्व पक्षीय पाठिंबा

बारामती, ८ डिसेंबर २०२०: दिल्लीत सुरू असणाऱ्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मंगळवारी पुकारलेल्या बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. यासाठी शहरातील व्यापारी, संस्था, खाजगी संस्थानी देखील उत्स्फूर्तपणे बंद पाळला. सगळ्या पक्षांनी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

दिल्ली मध्ये आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर केंद्र सरकारनं अश्रूधुर व पाण्याचा मारा केला, तसंच केंद्र सरकारनं आणलेल्या नवीन कृषी कायद्याच्या विरोधात जी धोरणं राबवली आहेत त्या विरोधात शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी आज दि. ८ मंगळवारी बारामती शहरात सर्व व्यापाऱ्यांनी कडकडीत बंद पाळल्याचं चित्र पाहायला मिळालं. तर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, आर पी आय कवाडे गट, शेकाप, सगळ्या पक्षांनी एकत्र येत शहरातील भिगवण चौकात हुतात्मा स्तंभाजवळ ठिय्या मांडून केंद्रातील भाजप सरकारच्या व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

यावेळी शेतकरी, सर्व पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी महिला पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. यावेळी संभाजी होळकर, सचिन सातव, ऍड राजेंद्र काळे, राजेंद्र ढवाण, आकाश मोरे, वीरधवल गाडे, वैभव बुरुंगले, रोहित बनकर, अनिताताई गायकवाड यांच्यासह सर्व पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल यादव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा