उस्मानाबादमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद

उस्मानाबाद,दि.२० मे २०२० : उस्मानाबाद शहरात एका तरुणाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने, शहरात सर्वत्र गंभीर वातावरण निर्माण झाले आहे. या परिस्थितीकडे गांभीर्याने लक्ष देऊन कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी सर्व बाजारपेठ बंद ठेवण्याचा आदेश आज(बुधवार) रोजी जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे यांनी केला.

शहर पोलीसांनी देखील शहरात स्पीकरवरून सर्व दुकाने बंद करण्याचा आदेश पुकारून सांगितला. आदेश ऐकल्यानंतर व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद केली. अत्यावश्यक वस्तूंची दुकाने वगळता बाकी सर्व दुकाने तसेच बाजारपेठा बंद करण्यात आल्या आहेत. सध्या उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा प्रादूर्भाव चांगलाच वाढला आहे. मंगळवारी ( दि.१९) रोजी रात्री आलेल्या अहवालानुसार उस्मानाबाद शहरामध्ये १ कोरोना रूग्ण आढळून आला आहे. यामुळे उस्मानाबाद शहरात खळबळ उडाली आहे.

न्यूजअनकट प्रतिनिधी: प्रगती कराड.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा