निधी न दिल्याचा आरोप करत मुख्यमंत्री ममता २९-३० मार्चला मोदी सरकारविरोधात करणार आंदोलन

कोलकाता, २१ मार्च २०२३: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारच्या केंद्रीय योजनांमध्ये निधी न दिल्याच्या विरोधात २९ आणि ३० मार्च रोजी उपोषण करण्याची घोषणा केलीय. पुरीला जाण्यापूर्वी कोलकाता विमानतळावर पत्रकारांशी बोलताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, केंद्र सरकार केंद्राच्या योजनांमध्ये राज्याला निधी देत ​​नाही. यंदाच्या अर्थसंकल्पात मनरेगा आणि गृहनिर्माण योजनेसाठी एक पैसाही देण्यात आलेला नाही. त्याविरोधात त्या स्वतः मुख्यमंत्री या नात्यानं २९ मार्च आणि ३० मार्च रोजी दिल्लीतील आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर आंदोलन करणार आहेत.

ममता बॅनर्जी म्हणाल्या, यावेळी बंगालला १०० दिवसांच्या कामासाठी बजेटमध्ये एक पैसाही देण्यात आलेला नाही. घरकुल योजनेत एक पैसाही दिला नाही. याआधीही ९५ लाख घरांच्या बांधकामासाठी पैसे शिल्लक आहेत. रस्ता बांधकामासाठी पैसे शिल्लक आहेत. १२ हजार किलोमीटरचे रस्ते स्वत:च्या पैशातून बनवले जात आहेत. १०० दिवसांचं काम, रस्तेबांधणी आदींसाठी केंद्र सरकार राज्याला पैसे देत नाही. ममता बॅनर्जी म्हणाल्या, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊनही या गोष्टी कुठंतरी बोलल्या गेल्या होत्या, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कोलकाता येथे आले होते. वारंवार पत्रं लिहिली आहेत, असं वारंवार सांगितलं गेलंय. भाजपच्या सांगण्यावरून मुद्दाम काही टीम बंगालमध्ये पाठवल्या जात आहेत.

ममता बॅनर्जी म्हणाल्या, “सीबीआय आणि ईडी एजन्सी सीबीआयचे संचालक भाजपचे ब्लॉक अध्यक्ष झाले आहेत. बंगालला वंचित ठेवलं जातंय, तर बंगालच्या योजनांचं केंद्र सरकारच्याच खात्यांनी कौतुक केलंय. अनेक पुरस्कार मिळाले, पण बंगालबाबत पक्षपात केला जात आहे. याविरोधातच सीएम ममता बॅनर्जी आंदोलन करणार आहेत. गॅसची किंमत ११०० रुपयांहून अधिक वाढत आहे. दिवसेंदिवस गॅसच्या किमती वाढत आहेत. सरकार आणि पक्ष वेगळे. सरकारमध्ये असाल तर पक्ष सोडून सर्वांना सोबत घेऊन विचार करावा लागेल. याचा प्रत्येकाने विचार करायला हवा, असं सीएम ममता बॅनर्जी म्हणाल्या.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा