टेलिकॉम कंपन्यांना दूरसंचार विभागाकडून स्पेक्ट्रमचे वाटप

नवी दिल्ली, १७ एप्रिल २०२१: दूरसंचार विभागाने काल स्पेक्ट्रम लिलाव, २०२१ मधील यशस्वी निविदाकारांना स्पेक्ट्रम लहरींचे वितरण यशस्वीरित्या पूर्ण केले. काल यशस्वी निविदाकारांना स्पेक्ट्रम लहरी प्रदान केल्याची पत्रे देण्यात आली.

स्पेक्ट्रम लहरी प्रदान करण्यासह स्पेक्ट्रमचे एकत्रीकरण करण्याचे कार्यान्वयन पूर्ण झाले. ज्यायोगे, चालू स्पेक्ट्रम लिलावामध्ये दूरसंचार सेवा प्रदात्यांना (टीएसपी) नियुक्त केलेले स्पेक्ट्रम क्षेत्र यापूर्वी त्यांना दिलेल्या स्पेक्ट्रम क्षेत्राशी , जेथे शक्य असेल तेथे, वेगवेगळ्या परवानाधारक सेवा क्षेत्रातील (एलएसए) विविध बँडमध्ये सुसंगत तयार करण्यात आले आहेत.

८०० मेगाहर्टझ बँडमधील १९ परवानाधारक सेवा क्षेत्र, ९०० मेगाहर्टझ बँडमधील ८ परवानाधारक सेवा क्षेत्र, १८०० मेगाहर्टझ बँडमधील २१ परवानाधारक सेवा क्षेत्र, २१०० मेगाहर्टझ बँडमधील ३ परवानाधारक सेवा क्षेत्र , २३०० मेगाहर्टझ बँडमधील १६ परवानाधारक सेवा क्षेत्र यामध्ये स्पेक्ट्रमचे एकत्रीकरण पूर्ण झाले. एकत्रीकरणाची कार्यवाही, दूरसंचार सेवा प्रदात्यांनी घेतलेल्या स्पेक्ट्रमचा अधिक कार्यक्षम उपयोग करण्यास सुलभ करते, जेणेकरून ग्राहकांच्या सेवेची गुणवत्ता सुधारली जाईल.

स्पेक्ट्रम लहरी प्रदान करण्याचा एक भाग म्हणून , समान बॅन्डमधील नंतरच्या तारखेला प्राप्त होणाऱ्या स्पेक्ट्रम क्षेत्राऐवजी विक्री नं झालेले तात्काळ उपलब्ध असलेले स्पेक्ट्रम क्षेत्र आणि परवानाधारक सेवा क्षेत्र प्रदान करण्याची मेसर्स भारती आणि मेसर्स रिलायन्स जिओ या दोन दूरसंचार सेवा प्रदात्यांची विनंतीदेखील सरकारने मान्य केली आहे. ऑगस्ट/सप्टेंबर २०२१ ऐवजी, सरकारला २३०६.९७ कोटी रुपयांची (मेसर्स भारतीकडून रु. १५७.३८ कोटी आणि मेसर्स रिलायन्स जिओ कडून रु. २१४९.५९ कोटी ) रक्कम तात्काळ प्राप्त झाली आहे.

हे लक्षात घ्यायला हवे की, १ आणि २ मार्च , २०२१. रोजी आयोजित केलेल्या स्पेक्ट्रम लिलाव , २०२१ मध्ये दूरसंचार सेवा प्रदात्यांनी स्पेक्ट्रमच्या ८०० मेगाहर्ट्झ, ९०० मेगाहर्ट्झ, १८०० मेगाहर्ट्झ, २१०० मेगाहर्ट्झ, आणि २३०० मेगाहर्ट्झ बँडचा एकूण ८५५.६० मेगाहर्ट्झ स्पेक्ट्रम प्राप्त केला होता. यशस्वी निविदाकारांकडून अधिग्रहित एकूण स्पेक्ट्रमची रु.७७८२०.८१ कोटी रक्कम देय आहे. त्यापैकी , निमंत्रित केलेल्या निविदांमधील अटी आणि शर्ती नुसार ,१८ मार्च , २०२१ रोजी दूरसंचार सेवा प्रदात्यांकडून रु. २१९१८.४७ कोटी रक्कम अग्रीम देय स्वरूपात स्वीकारण्यात आली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा