गोल पोस्ट महाराष्ट्र जिल्हा लोणी देवकर ग्रामपंचायतीकडून गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

लोणी देवकर ग्रामपंचायतीकडून गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

इंदापूर: करोनाच्या पार्श्वभूमीवर देशव्यापी लॉकडाउन सुरू असल्याने राज्यातील सर्वच उद्योगधंदे ठप्प झाले असून अर्थव्यवस्था मोडकळीस आली आहे.

करोनाच्या संकटातून हातावर पोट असलेला मजूर वर्ग संकटात सापडला आहे. ही बाब लक्षात घेत इंदापूर तालुक्यातील लोणी देवकर ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच अमोल तोरवे यांच्यातर्फे गावामध्ये नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.

गावचे प्रथम नागरीक या नात्याने अतिशय दुर्लक्षित पण कष्टाळू राबणाऱ्या हातांच्या पाठीशी उभे राहिल्याबद्दल नागरिकांनी सरपंचांचे आभार मानले.

यावेळी समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढे होऊन हातावर पोट असणाऱ्या नागरिकांना मदत करण्याचे आवाहन सरपंच अमोल थोरवे यांनी केले. यावेळी उपसरपंच विजय डोंगरे, ग्रामसेवक टी.डी. शिंदे आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

                                                                                                      प्रतिनिधी  – योगेश कणसे 

error: Content is protected !!
Exit mobile version