सौरव गांगुलींना ICC निवडणूक लढवण्याची परवानगी द्या’, ममता बॅनर्जींचे पंतप्रधान मोदींना आवाहन

पश्चिम बंगाल, १७ ऑक्टोबर २०२२ : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सौरव गांगुलीबाबत पंतप्रधान मोदींना विशेष आवाहन केले आहे. ममता बॅनर्जी म्हणाल्या की मी पंतप्रधानांना विनंती करते की सौरव गांगुली यांना आयसीसी निवडणूक लढवण्याची परवानगी द्यावी. ते एक लोकप्रिय व्यक्ती आहेत, म्हणून त्यांना नाकारले जात आहे. ममता बॅनर्जी म्हणाल्या की, भारत सरकारला विनंती आहे की, राजकीय निर्णय घेऊ नका, तर क्रिकेट, खेळासाठी निर्णय घ्या. ते राजकीय पक्षाचे सदस्य नाहीत.

काय म्हणाल्या ममता बॅनर्जी?

बंगालच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, सौरव गांगुलीला चुकीच्या पद्धतीने अध्यक्षपदावरून हटवण्यात आले आहे. मी खूप दु:खी असल्याचे मुख्यमंत्री म्हणाल्या. सौरव खूप लोकप्रिय व्यक्तिमत्व आहे. ते भारतीय संघाचे कर्णधार होते. त्यांनी देशाला खूप काही दिले आहे. ते केवळ बंगालचाच नव्हे तर भारताचे अभिमान आहे. त्यांना अशा प्रकारे वगळणे चुकीचे आहे.

सौरव गांगुलींची जागा रॉजर बिन्नी घेणार…….

मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारताचे माजी कर्णधार सौरव गांगुली यांना बोर्डाचे प्रमुख म्हणून कायम राहायचे होते, परंतु त्यांना इतर सदस्यांकडून पाठिंबा मिळाला नाही. रॉजर बिन्नी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) निवर्तमान अध्यक्ष सौरव गांगुली यांची जागा घेणार आहेत. सौरव गांगुली २०१९ मध्ये बीसीसीआयचे अध्यक्ष झाले. ते १८ ऑक्टोबर रोजी आपले पद सोडणार आहेत.

गांगुली CAB निवडणूक लढवणार….

बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा त्याग केल्यानंतर सौरव गांगुली यांनी क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालच्या (सीएबी) अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवणार असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, आयसीसी अध्यक्षपदासाठीही निवडणूक होत आहे. आयसीसी अध्यक्षपदासाठी २० ऑक्टोबरला नामांकन दाखल केले जाणार आहे. बीसीसीआयचे अध्यक्षपद सोडल्यानंतर गांगुली आयसीसी अध्यक्षपदाची निवडणूक लढवू शकतात, अशी चर्चा होती.

न्यूज अनकट प्रतिनिधी – सुरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा