गोल पोस्ट स्पॉटलाइट सिनेमा अल्लू अर्जुन च्या ‘पुष्पा:२’ च्या शूटिंगला सुरुवात

अल्लू अर्जुन च्या ‘पुष्पा:२’ च्या शूटिंगला सुरुवात

मुंबई ,२० , ऑक्टोबर २०२२ : दक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार अल्लू अर्जुनचा. बहुचर्चित ‘पुष्पा’ चित्रपटांने जोरदार धुमाकाळ घातला होता. हा चित्रपट हिंदीत प्रदर्शित झाला आणि हिंदीत ११० कोटीहुन आधिक कमाई केली, आणि या चित्रपटाने जोरदार यश मिळवले. चित्रपटाचे डायलॉग आजही प्रत्येकाच्या तोंडी आहेत. या चित्रपटाच्या तुफान यशानंतर दिग्दर्शक सुकुमार यांनी चित्रपटाच्या पुढील भागाची घोषणा केली होती, पण शूटिंग चालू झालं नव्हतं.

‘पुष्पा द रुल या’ सिनेमाची चाहते आतुरतेने वाट पाहत होते, अशातच अल्लू अर्जुन च्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. पुष्पा द रूल या सिनेमाच्या शूटिंगला अखेर सुरुवात झाली आहे. निर्मात्याने शूटिंग दरम्यानचे काही फोटो शेअर करत ही माहिती दिली आहे.

‘पुष्पा २’ मध्ये अल्लू अर्जुन, फहाद फाजील, रश्मिका मंदाना, दिशा पाटणी, विजय सेतुपती हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. तर या सिनेमाचे दिग्दर्शन सुकुमार करत आहेत, हा चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होणार असल्याचे म्हटले जात आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अंकुश जाधव

error: Content is protected !!
Exit mobile version