पुणे, दि. १७ जुलै २०२०: अल्लू अर्जुन भारतातील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक म्हणून ओळखला जातो. त्याचे दाक्षिणात्य चित्रपट प्रेक्षकांच्या आग्रहाखातर आता हिंदी भाषेतही डब होऊ लागले आहेत. अल्लूचा ‘अला वैकुंठापुरामाल्लू’ हा चित्रपट सध्या नेटफ्लिक्सवर ट्रेंडिंगमध्ये आहे.
गोल्डमाइंस टेलीफिल्म्मने ट्विट करुन ‘सराईनोडू’ युट्यूबवर ३० कोटी वेळा पाहिला गेल्याची माहिती दिली. सराईनोडू युट्यूबवर सर्वाधिक पाहिला गेलेला चित्रपट ठरला आहे. असं ट्विट त्यांनी केलं आहे. ‘सराईनोडू’ हा अल्लू अर्जुनच्या करिअरमधील सुपरहिट चित्रपटांपैकी एक आहे. हा एक तेलुगु चित्रपट आहे. या चित्रपटाचं हिंदी डबिंग गोल्डमाइंस टेलीफिल्म या कंपनीने केलं होतं. टिव्हीवर या चित्रपटाला सुरुवातीला केवळ १.१३ रेटिंग मिळाली होती.
‘सराईनाईडू’ या चित्रपटात आर्मीमधून निवृत्त झालेल्या एका जवानाची स्टोरी दाखवण्याच आली आहे. या चित्रपटात अल्लूसोबत कॅथरीन ट्रेसा व रकूल प्रित सिंग या अभिनेत्री झळकल्या आहेत. हा एक अॅक्शन विनोदी चित्रपट आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी













































