ॲमेझॉनने मागितली राज ठाकरे यांची माफी, उपलब्ध करणार मराठी भाषेचा पर्याय

मुंबई, २७ डिसेंबर २०२०: मनसेकडून ॲमेझॉन वर मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध व्हावा म्हणून मागणी करण्यात येत आहे. यासंदर्भात मनसेने ॲमेझॉन कार्यालयासमोर आंदोलने देखील केली. यानंतर ॲमेझॉनने कोर्टात धाव घेत मनसे विरुद्ध तक्रार देखील नोंदवली होती. यानंतर दिंडोशी कोर्टाने राज ठाकरे यांना नोटीस देखील पाठवली. मात्र, यानंतर शिवसेनेचे कार्यकर्ते अधिकच आक्रमक होऊन पुणे व मुंबई मधील ॲमेझॉनच्या कार्यालयांमध्ये तोडफोड केली होती.

यानंतर ॲमेझॉन च्या निधी विभागाचे प्रमुख विकास चोप्रा आणि उपप्रमुख राहुल सुंदरम यांनी चर्चा करण्याचा प्रस्ताव ठेवला. यानंतर आता मनसे व ॲमेझॉन यांच्यातील वाद निवळताना दिसत आहे. यासंदर्भात ॲमेझॉनने मनसेला एक ईमेल देखील पाठविला आहे. ज्यात त्यांनी आपल्या ॲपमध्ये व वेबसाईटवर मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध होण्याबाबत आश्वासन दिले आहे.

याचबरोबर मनसे कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांची माफी मागण्याचे आव्हान देखील केले होते. त्यानुसार ॲमेझॉन ने या ई-मेलमध्ये राज ठाकरे यांची माफी देखील मागितली आहे. तसेच येत्या पाच तारखेलामनसे कार्यकर्त्यान वर लावण्यात आलेले गुन्हे देखील मागे घेण्याचे कबूल केले आहे.

काय म्हंटले ई-मेल मध्ये

मराठी भाषेचा पर्याय असावा हा आमचा हेतू आहे. काही महिन्यात तांत्रिक बाबी पूर्ण करून मराठी भाषा उपलब्ध करण्याचा आमचा प्रयत्न आहे. एकदा ही प्रक्रिया पूर्ण झाली की ग्राहकांना मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध करून देण्याची माहितीही आम्ही मेसेज द्वारे कळवू.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा