नवी दिल्ली, १० सप्टेंबर २०२०: बहुराष्ट्रीय ई-कॉमर्स कंपनी ॲमेझॉन मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वात असलेल्या रिलायन्स ग्रुपच्या रिटेल व्यवसायात २० अब्ज डॉलर्स (सुमारे दीड लाख कोटी रुपये) गुंतवणूक करू शकते. ब्लूमबर्गच्या सूत्रांच्या हवाल्याने असे म्हटले आहे. रिलायन्सला आपल्या रिटेल व्यवसायातील ४० टक्क्यांपर्यंतचा हिस्सा विकायचा आहे, असे या प्रकरणाशी परिचित असलेल्या एका स्रोताचे म्हणणे आहे.
विशेष म्हणजे रिलायन्सच्या जिओ प्लॅटफॉर्ममध्ये पूर्वीच्या गुंतवणूकीनंतर सिल्व्हर लेक पार्टनर्सने (एसएलपी) रिटेल मध्ये दाव लावला होता. जगातील सर्वात मोठी टेक इनवेस्टर कंपनी सिल्व्हर लेक ७५०० कोटींची गुंतवणूक करेल. त्या बदल्यात कंपनीला रिलायन्स रिटेलमध्ये १.७५ टक्के हिस्सा मिळेल.
यासाठी रिलायन्स रिटेलचे मूल्यांकन ४.२१ लाख कोटी रुपये निश्चित करण्यात आले आहे. सिल्व्हर लेकने रिलायन्सच्या जिओ प्लॅटफॉर्ममध्ये १.३५ अब्ज डॉलर म्हणजेच सुमारे १० हजार कोटी रुपयांचा हिस्सा खरेदी केला आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे