गोल पोस्ट महाराष्ट्र अंबड स्थानिक गुन्हे शाखेकडून गुटख्यासहित ७० लाख ८२ हजाराचा मुद्देमाल जप्त

अंबड स्थानिक गुन्हे शाखेकडून गुटख्यासहित ७० लाख ८२ हजाराचा मुद्देमाल जप्त

अंबड, जालना १४ ऑगस्ट २०२४ : गुप्त माहिती मिळाल्यावरुन स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी जालना बीड महामार्गावर सापळा रचून राज्यात प्रतिबंधीत असलेला गुटखा घेऊन जाणारा ट्रक पकडला. यामध्ये सुमारे ५० लाख ८२ हजाराचा गुटखा तर २० लाखाची मालवाहू ट्रक असा ७० लाख ८२ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे.

काल संध्याकाळच्या सुमारास गस्तीवर असलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला एका गुप्त खबऱ्याने दिलेल्या माहितीवरून, जालना रोडवरील लालवाडी शिवारात असणाऱ्या जगदंबा राजस्थानी हॉटेल जवळ उभ्या असणाऱ्या एका ट्रकवर कारवाई करून गुटख्यासह एक आरोपी आणि गाडी ताब्यात घेण्यात आली. सदरील कारवाई पोलीस अधिक्षक श्री अजय कुमार बन्सल,अप्पर पोलीस अधिक्षक श्री आयुष नोपाणी,उपविभागीय पोलीस अधिकारी अंबड श्री विशाल खांबे,स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नी पंकज जाधव.यांच्या मार्गदर्शनखाली स्थानिक गुन्हेचे एपीआय योगेश उबाळे, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ, पोहेकॉ गोपाल गोशीक, पोहेकॉ लक्ष्मीकांत आळीप, पोकॉ भागवत खरात, पोकॉ सोपान क्षीरसागर, पोकॉ कैलास चेके, पोकॉ सचिन राऊत यांनी केलीय.

या प्रकरणी अंबड पोलिसात अन्न भेसळ प्रतिबंधक सुरक्षा कायद्याखाली गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळत आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी : श्रीधर कापसे

error: Content is protected !!
Exit mobile version