अंबडच्या पोलीस निरीक्षकाची ठाण्यातच गोळी मारून आत्महत्या

6

अंबड, नाशिक २० फेब्रुवारी २०२४ : नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक नजन यांनी आज त्यांच्या केबिनमध्ये डोक्यात गोळी मारून आत्महत्या केली. या घटनेने पोलीस आणि नागरिकात खळबळ माजली.

अशोक नजन हे आज सकाळी नेहमी प्रमाणे ड्युटी वर आले आणि केबिनमध्ये गेले. पोलीस ठाण्यात सकाळी रोल कॉल असतो, त्यामुळे सर्व कर्मचारी बाहेर उभे होते. साहेब अजून का आले नाही म्हणून एक पोलीस कर्मचारी त्यांना बोलावण्यास गेला असता त्यांना अशोक नजन हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. लागलीच वरिष्ठांना ही घटना कळवण्यात आली. पुढील तपास नाशिक पोलीस करत असुन आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही.

न्युज अनकट प्रतिनीधी : नाना आहिरे