गोल पोस्ट गुन्हा अंबड तालुक्यात दरोडेखोरांची मजुरांना मारहाण

अंबड तालुक्यात दरोडेखोरांची मजुरांना मारहाण

जालना, दि.२३ मे २०२०: अंबड तालुक्यातील दहयाळा येथे विहीरीचे खोदकाम करणाऱ्या मजुरांना दरोडेखोरांनी बेदम मारहाण करून मजुरांकडील दागिने, पैसे लुटून नेले. या घटनेत काही महिला गंभीर जखमी झाल्या आहेत.

चंदनापुरी खुर्द येथील गावाच्या पाणी पुरवठ्याच्या विहीरीचे दहयाळा शिवारात काम सुरू आहे. या विहीरीच्या कामावर घनसावंगी तालुक्यातील अंतरवाली टेंभी येथील मजूर कामाला आहेत.

शुक्रवारी( दि.२२) च्या पहाटे तीनच्या सुमारास अज्ञात १० ते ११ दरोडेखोरांनी या मजुरांवर हल्ला केला. यात गंगाराम पांडु शिंदे, गंगाराम रामा शिंदे,सुरेखा साहेबराव शिंदे , रेखाबाई राजु शिंदे, अणिता सुभाष शिंदे, सुभाष गंगाराम शिंदे, संतोष गंगाराम शिंदे, हे गंभीर जखमी असुन त्यात सुरेखा शिंदे हि महिला गंभीर जखमी असुन औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी:

error: Content is protected !!
Exit mobile version