अंबरनाथकरांच्या माणुसकीचे दर्शन,रांग लावून मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये मदत.

6

संपूर्ण देशभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असताना या संकटावर मात करण्यासाठी अनेक सेवाभावी संस्था, नागरिक पुढाकार घेऊन सरकारला मदत करतांना दिसून येत आहेत. असेच काहीसे चित्र अंबरनाथमध्ये सुद्धा दिसून आले आहे. आत्ता पर्यंत मदत मिळण्यासाठी नागरिकांनी रांग लावल्याचे चित्र सर्वत्र दिसत होते. परंतु सरकारला मदत करण्यासाठी अंबरनाथकरांनी रांगा लावल्याचे आश्चर्यकारक चित्र दिसून आले. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधी मध्ये मदत करण्याचे सर्व जनतेला आवाहन केले होते. याच पार्श्वभूमीवर अंबरनाथच्या नगराध्यक्षा मनीषा वाळेकर यांनी देखील अंबरनाथमधील नागरिकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये मदत करण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या याच आवाहनाला प्रतिसाद देत शहरातील अनेक सर्वसामान्य व प्रतिष्ठित नागरिक, व्यापारी यांनी अंबरनाथचे तहसीलदार जयराज देशमुख यांच्याकडे धनादेश जमा करून सुमारे १४ लाख ४७ हजार रुपयांचा निधी जमा करत कोरोना विरुद्धच्या लढाईत खारीचा वाटा उचलला आहे. अंबरनाथकरांनी अगदी दिलदार वृत्ती दाखवत अश्या कठीण प्रसंगी शासनाला जे सहकार्य केले आहे ते अगदी कौतुकास्पद आहे, आमच्या आवाहनला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिल्याने अंबरनाथमधील नागरिकांचे नगराध्यक्षा मनीषा वाळेकर यांनी आभार मानले आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा