आंबेडकरांचे स्मारक लवकरात लवकर पूर्ण करू: अजित पवार

मुंबई: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक इंदुमिल वर बांधण्यात येणार आहे. यां इंदू मिलमधील स्मारकाच्या कामाच्या काही परवानग्या न मिळाल्याने स्मारकाचे काम रखडले आहे. या परवानग्यांचा केंद्राशी काहीही संबंध नसून राज्यस्तरावरील या परवानग्या आहेत. त्या लवकरच देण्यात येतील आणि येत्या दोन वर्षात म्हणजे १४ एप्रिल २०२२ पर्यंत या स्मारकाचं काम पूर्ण करण्यात येईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

उपमुख्यमंत्रिपदाचा पदभार पदभार अजित पवार यांनी आज स्वीकारला. हे करत असताना इंदू मिलमध्ये येऊन आंबेडकर स्मारकाच्या कामाची पाहणी त्यांनी केली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी स्मारक विषयी हे आश्वासन दिले. त्याआधी अजित पवार यांनी चैत्यभूमीवर जाऊन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं.

पुढे ते म्हणाले की, ‘इंदू मिलमधील स्मारकाच्या कामात कोणत्याही अडचणी येणार नाही. या स्मारकासाठी काही परवानग्या बाकी आहेत. राज्यस्तरावरच्या या परवानग्या बाकी असून त्या आम्ही लवकरात लवकर देऊ. स्मारकाच्या बाबतीत काही निर्णय मागच्या सरकारमध्ये ठरावीक पातळीवर घेतले होते. कॅबिनेटमध्ये त्याला मान्यता देण्यात आली नव्हती. आम्ही लवकरच या निर्णयाला कॅबिनेटमध्ये मान्यता देऊ

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा