आंबेगाव : आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील पारगाव शिंगवे येथील मीना नदीच्या पात्रात अवैध वाळू उपसा करणाऱ्या वर वाळू चोरी केल्याप्रकरणी मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नदीपात्रातून वाळू कोणी चोरून नेत असेल तर त्याबाबतची माहिती महसूल विभागाला द्यावी, असे आवाहनही तहसीलदार रमा जोशी यांनी केले आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, तहसीलदार रमा जोशी यांना गुप्त बातमी दाराकडून पारगाव गावच्या हद्दीत मीना व घोड नदीपात्रात अवैधरित्या वाळू उपसा करत असल्याची माहिती मिळाली त्यानुसार त्यांनी तलाठी संतोष जोशी यांना कळवले नंतर तहसीलदार रमा जोशी , मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी सदर ठिकाणी जाऊन पाहिले असता २३ ब्रास वाळूचे उत्खनन करून सरकारी मालमत्तेचे चोरी झाल्याचे लक्षात आले.
याबाबत अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर सदर ठिकाणी तहसीलदार रमा जोशी व तलाठी संतोष जोशी यांनी पंचनामा केला असून जोशी यांनी अवैध वाळूउपसा करणाऱ्यांच्या विरोधात मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे पुढील तपास पोलिस कर्मचारी सागर गायकवाड करत आहे.