गोल पोस्ट गुन्हा आंबेगाव तालुक्यातील मंचर येथे युवकाची आत्महत्या

आंबेगाव तालुक्यातील मंचर येथे युवकाची आत्महत्या

आंबेगाव – आंबेगाव तालुक्यातील मंचर येथे एका एकोणवीस वर्षीच्या मुलाने राहत्या घरात आत्महत्या केली आहे. ॠषिकेश नारायण बांगर ( वय १९) या युवकाने राहत्या घरात पंख्याच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याबाबत नारायण पांडुरंग बांगर यांनी मंचर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

मंगळवार दि.१० रोजी रात्री दहाच्या सुमारास नारायण बांगर व यांचे वडील पिंपळगाव (खडकी ) येथील घरात आपली सर्व कामे आटपून झोपी गेले होते. त्यांना पहाटे साडे तीनच्या सुमारास त्यांच्या मोबाईलवर त्यांची मुलगी पूनमने फोन करून कळवले की, तीनच्या सुमारास ऋषिकेशने राहत्या घरी बेडरूम मधील पंख्याला लेगीजने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे,बांगर यांनी त्यांच्या मंचर येथील पॅराडाईस सोसायटी मधील घरी येऊन पाहिले असता त्यांना ऋषिकेशने आत्महत्या केलेले दिसले.बांगर यांनी तात्काळ मंचर पोलिसांना या घटनेची माहिती संपर्क साधून दिली. ऋषिकेश यास मंचर ग्रामीण रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले आहे. ऋषिकेश याने आत्महत्या का केली याबाबत काहीच माहिती नसल्याचे सांगितले.पुढील तपास पोलीस करत आहेत.

error: Content is protected !!
Exit mobile version