‘आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीज’ कडून पाच रुग्णालयांना रुग्णवाहिकांचे वाटप

पुणे, १० मार्च २०२१: राज्यात कोरोना चा उद्रेक पुन्हा एकदा पहायला मिळत आहे. सध्या अशा परिस्थितीत वैद्यकीय सुविधांची पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर गरज लागणार आहे.  संभाव्य परिस्थिती पाहता ‘आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीज’ ने वैद्यकीय सुविधांचे महत्त्व लक्षात घेऊन पाच रुग्णालयांमध्ये रुग्णवाहिका मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे.
आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीज आपले सामाजिक दायित्व निभावण्यात नेहमीच अग्रेसर राहिली आहे. यापूर्वीही कंपनीने कोरोना काळात वैद्यकीय कर्मचाऱ्यांना तसेच पोलीस कर्मचाऱ्यांना अत्यावश्यक गोष्टींचे वाटप देखील केले होते.येत्या २७ तारखेला कंपनी आपल्या विविध प्रकल्पांची सुरुवात करत आहे. आपल्या या विविध प्रकल्पांच्या सुरुवाती बरोबरच कंपनीने समाज उपयोगी अनेक कामे देखील केली आहेत. ज्यामध्ये गरजू शेतकऱ्यांना सोलर पंपाचे वाटप, २५ शासकीय शाळांमध्ये ई-लर्निंग साधनांचे वाटप यांसारखी सामाजिक कार्य कंपनी करत आली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा