जननायक जनता पार्टी (जेजेपी) नेते दुष्यंत चौटाला यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत म्हटले आहे की जे आमच्याशी सहमती दर्शवेल अशा पक्षाला अमाची साथ मिळेल. राज्यातील १० जागा जिंकल्यानंतर हरयाणामध्ये किंगमेकर म्हणून उदयास आलेल्या जननायक जनता पक्षाचे नेते दुष्यंत चौटाला म्हणाले की, जेजेपी आपल्या धोरणांचा आदर करणाऱ्या पक्षाला पाठिंबा देईल. शुक्रवारी पत्रकार परिषदेत दुष्यंत चौटाला म्हणाले की, “आज विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत मी आमदारकीचा नेता असल्याचा ठराव मंजूर झाला. “राज्याच्या विकासासाठी आमच्या पक्षाचा सामान्य किमान अजेंडा स्वीकारण्यास कोणी तयार असेल तर सर्व पर्याय खुला आहेत,” असे दुष्यंत चौटाला म्हणाले. त्यांचा पक्ष भाजपला किंवा कॉंग्रेसला पाठिंबा देणार का असे विचारले असता चौटाला यांनी कोणतेही मत देले नाही.