बारामती : बारामतीत कृषिक प्रदर्शनाच्या निमित्ताने आलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची सोबत सोडत उपमुख्यमंत्री अजित पवार चालवित असलेल्या मोटारीत असून आता आमच्या सरकारचं स्टेअरिंग अजितदादांकडे असल्याची मिश्किल टिपण्णी उद्धव ठाकरे यांनी केली.
बुधवारीच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार हे आमच्या सरकारची स्टेपनी असल्याचे म्हटले होते. परंतु शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्र्यांनी मात्र सत्तेचं स्टेअरिंग अजित पवार यांच्याकडे असल्याचे बारामतीत सांगितले.
बारामतीतील कृषिक प्रदर्शन उदघाटनानंतर मुख्यमंत्र्यांनी मंत्रीमंडळातील आपल्या अन्य सहकाऱ्यांसह खा. शरद पवार यांच्या गोविंदबागेतील निवासस्थानी भोजनाचा आस्वाद घेतला.