अमेरिका व इराण देशांतील तणावाचा सेन्सेक्सवर परिणाम

मुंबई : अमेरिका आणि इराण या देशांदरम्यान वाढत्या तणावाचा परिणाम मुंबई शेअर बाजारावर झाल्याचे चित्र दिसून येत आहे. सेन्सेक्स तब्बल ६०० अंकांनी घसरला असून त्यात भारतीय रुपयाचे डॉलरच्या तुलनेत २८ पैशांनी अवमुल्यन होऊन तो ७२.०८ वर गेला.
सोमवारी सकाळी ४०,५८५ अंकावर व्यवहार चालू असतानाच सेन्सेक्सची ६०५ अंकांनी घसरण निफ्टीचाही १२,०४४ वर व्यवहार चालू असतानाच त्यामध्येही १८२ अंकांनी घसरण झाली. सकाळी गुंतवणूकदारांनी शेअर्सची मोठ्या प्रमाणावर विक्री केल्यामुळे सेन्सेक्स घसरला.

अमेरिका आणि इराण संघर्ष विकोपाला जाण्याची चिन्हे आहेत. अमेरिकेने इराणवर निर्बंध लादण्याची धमकी दिल्यामुळे कच्या तेलांच्या किमतीत २ टक्यांनी वाढ झाली आहे. ज्याचा परिणाम जगभरातील पेट्रोल डिझेलच्या किमतीवर होत आहे. दरम्यान, असाच नकारात्मक परिणाम सिंगापूर आणि जपानमधील शेअर बाजारात देखील दिसून आला आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा